Friday, May 10, 2013

WATCH : Pandurang Patil / पांडुरंग पाटील.... एक एकरातून स्वावलंबन


By Shubhada Pandhare 
Published on 9 May 2013
पांडुरंग पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील खेडे गावचे रहिवासी. त्यांच्याकडे १ एकर डोंगरउताराची जमीन आहे. त्यामध्ये ते भाजीपाला पिके घेतात. सुरवातीला ते मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते-कीटकनाशके वापरीत होते. पण यामुळे वाढता उत्पादन खर्च व जमिनीचा कस कमी होणे यामुळे त्यांनी टप्या-टप्यात रासायनिक खते-कीटकनाशकांचा वापर कमी केला व आता ते पूर्वीच्या तुलनेत केवळ १०% रासायनिक खते वापरतात व भविष्यात पूर्णत: सेंद्रिय शेती करण्याचा मानस आहे. त्यांचे भाजीपाला पिकाचे सुयोग्य नियोजन, स्वत: शेतमालाची विक्री करणे यामुळे त्यांनी एका एकरातून स्वावलंबन साधले आहे.

No comments:

Post a Comment