Showing posts with label ZBNF. Show all posts
Showing posts with label ZBNF. Show all posts

Friday, January 29, 2016

विषय: पुण्यात पाळेकरांसोबत एक अति महत्वपूर्ण बैठक

 
कृषी-ऋषी श्री सुभाष पाळेकर गुरुजींची पुण्यात राहणाऱ्या आणि झिरो बजेट नैसर्गिक शेती जन आंदोलनाच्या कार्यात ज्या कोणाला ह्या सहभाग घ्यावयाचा आहे अश्या सर्वासाठी एक अति महत्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. सहभाग हा कोणत्याही स्वरूपाचा असू शकतो जो तुम्हाला शक्य असेल तो, अधिक माहिती गुरुजीं बैठकीत सांगतील.
 
तेव्हा सर्वांनी आवर्जून रविवार ७ फेब्रुवारी, दुपारी १:३० वा. पुण्यधाम आश्रम, खडी मशीन चौक, कोंढवा (बु). येथे यावे ही विनंती. बैठक अंदाजे संध्या ६ वा. पर्यंत चालेल. 
 
 
विशेषता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणार्यांनी आवर्जून यावे असे आग्रहाचे आवाहन पाळेकरांनी केले आहे. ज्यांना मराठी येत नसेल त्यांनी सुद्धा यावे, त्यांच्याशी हिंदी/इंग्रजी मधे संवाद साधल्या जाईल किंवा जास्त संख्या असेल तर बैठक हिंदी/इंग्रजी होवू शकते.
 
आपल्याला जर काही कारणास्तव हया बैठकीला येऊ शकता आले नाही, पण काम करण्याची इच्छा आहे अशांनी कृपया नंतर दीपकशी (९८५०४३००८५ deepakkumars@yahoo.com) किंवा मिलिंदशी (९८९०६६४३२१) संपर्क करावा. 
तुमच्या संपर्कातील लोकांना हा संदेश कळवा. 
 
भेटू या !
 
-मिलिंद / दीपक

Subject : Very important personal meeting with Krishi-Rishi Padmashri Shri. Subhash Palekar sir at Pune on Sunday, 7 Feb 2016.
 
ALL those who are willing to contribute for Public movement of Zero Budget Natural Farming are invited for very important meeting with Padmashri Subhash Palekar sir in Pune.
Your contribution can be of any form whatever is possible for you, sir will discuss more on that in meeting. This will help you to find yourself how you can join, contribute and be a part of this movement for all. Especially those who are working in IT and Technology area and willing to contribute should not miss this.
Based on participants Guruji will communicate in Marathi, Hindi or English.
 
Venue :  Punyadhyam Ashram, Khadi Machine Chowk, Kondhawa, PUNE.
               1.5 km from Khadi Machine Chowk.
Day/Time : Sunday, 7 Feb 2016 , 1:30 pm to 6pm (Please be in time.)
Contact : 9890664321 / 9850430085 , deepakkumars@yahoo.com
 
Please spread this message in your social contacts.
 
Regards
Back To Nature Group &
ZBNF Movement Pune.

Monday, January 25, 2016

जीरो बजट प्राकृतिक (आध्यात्मिक) खेती प्रशिक्षण के MP3-ऑडिओ / MP4- विडिओ हिंदी, अंग्रेजी में उपलब्ध:

उच्च दर्जे की - ज्यादा ऊपज की, शुन्य लागत की, जहर मुक्त, कर्ज मुक्त, चिंता मुक्त, कष्ट मुक्त, आत्महत्या मुक्त, शोषण मुक्त, रोग-कीट मुक्त, प्राकृतिक संकट मुक्त - एैसी खेती जो किसानों को सही अर्थ में सुखी–समृद्ध–स्वावलंबी करने वाली एवं प्रकृति, ज्ञान-विज्ञान, अहिंसा और आध्यात्म आधारित शाश्वत कृषी पध्दती…
प्रशिक्षण के MP3-ऑडिओ / MP4- विडिओ हिंदी में उपलब्ध:

हिंदी में विडिओ / HINDI VIDEO:

 
कृपया यह संदेश तेजी से ज्यादा से ज्यादा लोगों तक पहुँचाइये - ज्योत से ज्योत जलाओ !
आभार और धन्यवाद!
 
मिलिंद काले - ९८९०६६४३२१ MilindShrirangKale@gmail.com
दीपक श्रोते - ९८५०४३००८५ deepakkumars@yahoo.com
 

Friday, January 22, 2016

[zerobudgetnaisargiksheti] संपूर्ण शिबिर आता केबल नेटवर्क वर

नमस्कार,

एक अतिशय आनंदाची बातमी आहे. श्री राहुल प्रदीप जाधव हे मु. पो. दुधोंडी, ता. पलूस, जि. सांगली येथे राहतात. त्यांच्या ह्या गावी त्यांचे "श्री ९ मिडिया" नावाचे केबल नेटवर्क आहे. हे केबल नेटवर्क जवळपासच्या ६० गावांपर्यंत असलेल्या अंदाजे ८००० घरांमध्ये पोहचलेले आहे. श्री राहुल ह्यांनी एक क्रांतीकारात निर्णय घेतला आहे तो असा की येत्या २६ जानेवारी (गणतंत्र दिन) पासून कृषी-ऋषी श्री सुभाष पालेकर यांचे झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे संपूर्ण शिबिर ते हया केबल नेटवर्क वरून किमान १ महिनाभर दाखवणार आहेत. चित्रपट किंवा अन्य कार्यक्रमा ऐवजी रोज सकाळी आणि संद्याकाळी/रात्री २ ते ३ तास हे शिबिर प्रसारित होईल. अधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी ते केबल वरून गेल्या १५ दिवसापासून जाहिरात सुद्धा प्रसारित करत आहेत. ही महाराष्ट्रातील पहिली घटना असेल की केबल नेटवर्क वरून संपूर्ण शिबीर दाखवण्यात येईल. तेव्हा श्री राहुल आणि त्यांचा "श्री ९ मिडिया" ला हार्दिक शुभेच्छा !

केबल नेटवर्कसाठी संपर्क:
श्री ९ मिडिया, श्री राहुल प्रदीप जाधव
मु. पो. दुधोंडी ता. पलूस जि. सांगली 


मो. ७७१९९७९९९९, ९९२१७२४४४४, ०२३४६२७६३००
ईमेल: shri9media@gmail.com

आपणही आपल्या गावात/तालुक्यात असा केबल नेटवर्कचा प्रयत्न करू शकत. 

धन्यवाद !
आपलं झिरो बजेट 

Tuesday, December 8, 2015

EVENT: झिरो बजेट नैसर्गिक (आध्यात्मिक) शेती - प्रशिक्षण शिबिर

Inline images 1

झिरो बजेट नैसर्गिक (आध्यात्मिक) शेती - प्रशिक्षण शिबिर
मार्गदर्शक: कृषी-ऋषी श्री. सुभाष पाळेकर
दिनांक : २३ ते ३० डिसेंबर २०१५ (बुधवार ते बुधवार - ८ दिवस)
स्थळ: तनपुरे महाराज मठ, मंदिर रस्ता, पंढरपूर, जि. सोलापूर
संपूर्ण शुल्क: प्रतिव्यक्ती रु.८००/- प्रशिक्षण, नाष्टा-भोजन सहित (निवास खर्च वेगळा)
नाव नोंदवासाठी संपर्क: ८८०६१३००९, ९४२१०६५१९३, ९९७०९९५२९६, ९७६३४७६३४६ 

धन्यवाद ! 
मिलिंद + दीपक

झिरो बजेट नैसर्गिक (आध्यात्मिक) शेतीचे संपूर्ण प्रशिक्षण शिबिर आता MP३ स्वरुपात

सोन्या पेक्षाही बहुमोल असे हे ज्ञान लुटा (Download करा ) आणि इतरांनाही वाटा. झिरो बजेट नैसर्गिक (आध्यात्मिक) शेतीचे संपूर्ण प्रशिक्षण शिबिर  आता MP३ स्वरुपात येथे "http://zbnfmp3.Blogspot.com" उपलब्ध झाले आहे. धन्यवाद !

EVENT: [zerobudgetnaisargiksheti] कृषी ज्ञान यज्ञ सोहळा: २३ ते ३० डिसेंबर २०१५


नमस्कार,

योग्य दिशा व मार्ग मिळत नसल्याने शेतकरी निराश/हताश होत आहेत. आत्महत्या हा उपाय नाही तर त्यांना झिरो बजेट नैसर्गिक (आध्यात्मिक) शेती चा मार्ग आवश्य दाखवा. आपल्या मार्फत खूप शेतकरी शिबिरात येतील अशी आशा करू या !  
जे आधी शिबीरात आले आहेत किंवा ज्यांना हया जन आदोलानाबद्दल माहिती आहे त्यांनी आपल्या गावातील किमान ५ शेतकऱ्यांना हया कृषी ज्ञान प्रशिक्षणात आवर्जुन पाठवावे.

भरपूर उत्पन्नाची, दर्जेदार मालाची, शुन्य खर्चाची, कर्ज मुक्त, चिंता मुक्त, विष मुक्त, कष्ट मुक्त, आत्महत्या मुक्त, शोषण मुक्त, रोग-किडी मुक्त, दुष्काळ मुक्त, अवकाळी संकट मुक्त अशी ही शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सुखी–समृद्ध–स्वावलंबी करणारी निसर्ग, ज्ञान-विज्ञान, अहिंसा व आध्यात्म आधारित शाश्वत कृषी पध्दती.…
वरील व्याक्य खरं वाटत नाही ना ? मग पहा या यशोगाथा -


झिरो बजेट नैसर्गिक (आध्यात्मिक) शेती - प्रशिक्षण शिबिर
मार्गदर्शक: कृषी-ऋषी श्री. सुभाष पाळेकर
दिनांक : २३ ते ३० डिसेंबर २०१५ (बुधवार ते बुधवार - ८ दिवस)
स्थळ: तनपुरे महाराज मठ, मंदिर रस्ता, पंढरपूर, जि. सोलापूर
संपूर्ण शुल्क: प्रतिव्यक्ती  किंवा  पती+पत्नी  रु.८००/- प्रशिक्षण, नाष्टा-भोजन सहित (निवास खर्च वेगळा)
नाव नोंदवासाठी संपर्क: ८८०६१३००९, ९४२१०६५१९३, ९९७०९९५२९६, ९७६३४७६३४६ 

महत्वाची सूचना: खास करून नोकरी करण्यासाठी हे शिबीर नाताळच्या सुट्टीत आले आहे तेव्हा ह्या सुवर्ण संधीचा चांगला लाभ घ्या. नियोजन करा व शिबिरात येण्यासाठी नाव नोंदवा. 
( विशेष विनंती: IT क्षेत्रात काम करणाऱ्यांनी ह्या शिबिरात आवर्जून यावे. )


धन्यवाद ! 
मिलिंद + दीपक