Friday, January 22, 2016

[zerobudgetnaisargiksheti] संपूर्ण शिबिर आता केबल नेटवर्क वर

नमस्कार,

एक अतिशय आनंदाची बातमी आहे. श्री राहुल प्रदीप जाधव हे मु. पो. दुधोंडी, ता. पलूस, जि. सांगली येथे राहतात. त्यांच्या ह्या गावी त्यांचे "श्री ९ मिडिया" नावाचे केबल नेटवर्क आहे. हे केबल नेटवर्क जवळपासच्या ६० गावांपर्यंत असलेल्या अंदाजे ८००० घरांमध्ये पोहचलेले आहे. श्री राहुल ह्यांनी एक क्रांतीकारात निर्णय घेतला आहे तो असा की येत्या २६ जानेवारी (गणतंत्र दिन) पासून कृषी-ऋषी श्री सुभाष पालेकर यांचे झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे संपूर्ण शिबिर ते हया केबल नेटवर्क वरून किमान १ महिनाभर दाखवणार आहेत. चित्रपट किंवा अन्य कार्यक्रमा ऐवजी रोज सकाळी आणि संद्याकाळी/रात्री २ ते ३ तास हे शिबिर प्रसारित होईल. अधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी ते केबल वरून गेल्या १५ दिवसापासून जाहिरात सुद्धा प्रसारित करत आहेत. ही महाराष्ट्रातील पहिली घटना असेल की केबल नेटवर्क वरून संपूर्ण शिबीर दाखवण्यात येईल. तेव्हा श्री राहुल आणि त्यांचा "श्री ९ मिडिया" ला हार्दिक शुभेच्छा !

केबल नेटवर्कसाठी संपर्क:
श्री ९ मिडिया, श्री राहुल प्रदीप जाधव
मु. पो. दुधोंडी ता. पलूस जि. सांगली 


मो. ७७१९९७९९९९, ९९२१७२४४४४, ०२३४६२७६३००
ईमेल: shri9media@gmail.com

आपणही आपल्या गावात/तालुक्यात असा केबल नेटवर्कचा प्रयत्न करू शकत. 

धन्यवाद !
आपलं झिरो बजेट 

No comments:

Post a Comment