Wednesday, January 27, 2016

EVENT : [zerobudgetnaisargiksheti] डहाणू आणि अलिबाग शिबिर

नमस्कार,

विषारी रासायनिक खतं व कीटकनाशकांमुळे जीव, जमीन, पाणी आणि पर्यावरण हया सर्वांना धोका निर्माण झाला आहे. तसेच फळ, भाज्या, धान्य विषारी बनले आणि ते खाल्याने मानवी आरोग्य खूप बिघडत चालले आहे. पर्यावरणाचा विनाश टाळण्याची आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात आपले आरोग्य सुधारण्याची अत्यंत आवश्यकता आहे. हया विषयावर, विशेष करून मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इत्यादी जवळपासच्या जिल्यातील शेतकरी आणि नागरिकांसाठी, कृषी-ऋषी श्री सुभाष पाळेकर यांचे एक-एक दिवसांची दोन शिबिरे १) डहाणू व २) अलिबाग येथे आहे. त्याचा तपशील असा:

डहाणू शिबिर:
स्थळ: पंचशील समाज चँरिटेबल ट्रस्ट सभागृह
डहाणू, जि. पालघर 
दिनांक : बुधवार, ३ फेब्रुवारी २०१६
वेळ : सकाळी ९ ते संध्या ६ वाजे पर्यंत
संपर्क: ९२२६४८४२२८, ९४२३३५८०७८


अलिबाग शिबिर:
स्थळ: भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय
निलिमा हॉटेल मागे, चेंढरे, अलिबाग, जि. रायगड
दिनांक: शुक्रवार, ५ फेब्रुवारी २०१६
वेळ : सकाळी ९ ते संध्या ६ वाजे पर्यंत
संपर्क: ८३७८९६४३३३, ९४२२०९४०७८, ०२१४१-२२५०५०

तुमच्या सोशल मिडियावर (Whats app, Facebook, Twitter etc) टाकण्यासाठी सोबत GIF जोडली आहे. 

आभार !

No comments:

Post a Comment