नमस्कार,
योग्य दिशा व मार्ग मिळत नसल्याने शेतकरी निराश/हताश होत आहेत. आत्महत्या हा उपाय नाही तर त्यांना झिरो बजेट नैसर्गिक (आध्यात्मिक) शेती चा मार्ग आवश्य दाखवा. आपल्या मार्फत खूप शेतकरी शिबिरात येतील अशी आशा करू या !
जे आधी शिबीरात आले आहेत किंवा ज्यांना हया जन आदोलानाबद्दल माहिती आहे त्यांनी आपल्या गावातील किमान ५ शेतकऱ्यांना हया कृषी ज्ञान प्रशिक्षणात आवर्जुन पाठवावे.
भरपूर उत्पन्नाची, दर्जेदार मालाची, शुन्य खर्चाची, कर्ज मुक्त, चिंता मुक्त, विष मुक्त, कष्ट मुक्त, आत्महत्या मुक्त, शोषण मुक्त, रोग-किडी मुक्त, दुष्काळ मुक्त, अवकाळी संकट मुक्त अशी ही शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सुखी–समृद्ध–स्वावलंबी करणारी निसर्ग, ज्ञान-विज्ञान, अहिंसा व आध्यात्म आधारित शाश्वत कृषी पध्दती.…
वरील व्याक्य खरं वाटत नाही ना ? मग पहा या यशोगाथा -
झिरो बजेट नैसर्गिक (आध्यात्मिक) शेती - प्रशिक्षण शिबिर
मार्गदर्शक: कृषी-ऋषी श्री. सुभाष पाळेकर
दिनांक : २३ ते ३० डिसेंबर २०१५ (बुधवार ते बुधवार - ८ दिवस)
स्थळ: तनपुरे महाराज मठ, मंदिर रस्ता, पंढरपूर, जि. सोलापूर
संपूर्ण शुल्क: प्रतिव्यक्ती किंवा पती+पत्नी रु.८००/- प्रशिक्षण, नाष्टा-भोजन सहित (निवास खर्च वेगळा)
नाव नोंदवासाठी संपर्क: ८८०६१३००९९, ९४२१०६५१९३, ९९७०९९५२९६, ९७६३४७६३४६
महत्वाची सूचना: खास करून नोकरी करण्यासाठी हे शिबीर नाताळच्या सुट्टीत आले आहे तेव्हा ह्या सुवर्ण संधीचा चांगला लाभ घ्या. नियोजन करा व शिबिरात येण्यासाठी नाव नोंदवा.
( विशेष विनंती: IT क्षेत्रात काम करणाऱ्यांनी ह्या शिबिरात आवर्जून यावे. )
धन्यवाद !
मिलिंद + दीपक
No comments:
Post a Comment