नागपूर बीजोत्सव 2015 चे निमंत्रण
नागपूर बीजोत्सव 2015 ला सगळ्यांचे स्वागत
बीज वैविध्यता, सेंद्रीय शेतमाल, पुस्तके, बीजसंवर्धकांच्या भेटी, गाणी, गप्पा व इतर गम्मतजम्मतसाठी जरूर या! कार्यक्रम पत्रिका व इतर तपशील सोबत जोडले आहेत. आणि हो, येताना आपापले पेले घेवून या म्हणजे आपल्याला प्लास्टिकच्या पेल्यांचा वापर टाळता यॆईल!
दि 13-14-15 फेब्रुवारी 2015 (शुक्र, शनि, रवि)
स्थळ: सर्वोदय आश्रम, भोले पेट्रोल पंपाजवळ, धरमपेठ, अमरावती मार्ग, नागपूर
नोंदणी शुल्क रु. 300/- तीन दिवसांच्या राहण्या-खाण्याच्या व्यवस्थेसाठी.
कृपाया नोंद घ्यावी, संकल्पना व कार्यक्रम पत्रिका सोबत जोडत आहे
नोंदणी, प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी अथवा मदतीसाठी आमच्याशी संपर्क साधा.
इतर इच्छुकांना व प्रसार माध्यमांनादेखील याबद्दल सांगा. आमचा फेसबुक पत्ता:https://www.facebook.com/ events/881449128543295
लवकरच भेटू!
बीज जीवनाचं प्रतीक आहे. त्यातून नवनिर्मिती होते. बीजोत्सव म्हणजे जीवनाचा उत्सव. त्यात सर्वांच्या हिताचा विचार आहे.
रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके आणि अन्य रसायनांमुळे सृष्टीचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यात आता जनुकीय परिवर्तित (जी.एम.) बियाण्यांचीही भर पडली आहे. त्यामुळे पर्यावरणाची हानी आणि मानवी आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. म्हणूनच प्रदूषणकारी रसायनांना नाकारून पर्यावरणस्नेही तंत्रज्ञानाची कास धरणे अपरिहार्य आहे.
सेंद्रीय, नैसर्गिक, जैविक, शाश्वत, चिरंजीवी, इ. नावाने पर्यावरणस्नेही शेती पद्धतीचे प्रयोग जगभर सुरू आहेत. भारतातही गेल्या तीन दशकांपासून या दिशेने कार्य सुरू आहे. हळूहळू ही चळवळ आता जनमानसात रुजत आहे. “बीजोत्सव” त्या दिशेने वाटचाल करणारा उपक्रम आहे.
विषमुक्त / जैविक शेती करणार्यांची संख्या आज तोकडी आहे. मागणी भरपूर असूनही या शेतीपद्धतीकडे शेतकरी वळत नाहीत. प्रचलित रासायनिक पद्धतीकडून नैसर्गिक शेतीकडे वळण्यासाठी शेतकर्यांना काही पाठबळ लागू शकते. उत्पादन घटले तर काय हा प्रश्न त्यांच्यापुढे असतो. अशा वेळी ग्राहक त्यांच्या पाठीशी असले तर शेतकरी हिमतीने वाटचाल करू शकतात. म्हणूनच ग्राहक आणि शेतकर्यांचा थेट संपर्क यावा, त्यात नुसतेच देवाण-घेवाणीचे व्यापारी नाते न राहता मानवीय संबंधांचा विकास होणे आवश्यक आहे. बीजोत्सवात त्या दिशेने विशेष प्रयत्न केले जातील.
जैविक शेतमाल सर्वांना योग्य दरात उपलब्ध होण्यासाठी ग्राहकांचा पुढाकार सर्वाधिक परिणामकारी ठरू शकतो. म्हणूनच शहरात ग्राहकांचे गट बनावेत, त्यांचा शेतकर्यांशी थेट संपर्क व्हावा, ग्राहकांनी अधूनमधून शेतकर्यांकडे जावे, शेतांना भेटी द्याव्यात, प्रत्यक्ष कामातही जमेल तसे सहभागी व्हावे, अशा प्रयत्नातूनच नैसर्गिक शेतीचा विस्तार होईल आणि त्याला लोकचळवळीचे रूप येईल.
नैसर्गिक संसाधनांचे जतन करून मानवीय मूल्ये जोपासणे हा नैसर्गिक शेती चळवळीचा प्रमुख उद्देश हवा. त्यात हल्लीची व्यापार नव्हे तर परस्परपूरक नात्यांचा विकास अपेक्षित आहे. त्यातूनच सर्वांचे भले साध्य होवू शकते.
आणि या देशेने एक पाऊल पुढे जाण्यासाठीच बीजोत्सवाचे प्रयोजन.
या उत्सवात आपण देखील सहभागी व्हावे यासाठी हे निमंत्रण. खाली कार्यक्रम पत्रिका जोडली आहे. आणि जाता-जाता एक आवाहन देखील. आपण दरवर्षी हा उत्सव स्वेच्छा देणग्यांच्या जोरावर पार पाडतो तसेच यावर्षीही करणार आहोत. तरी ज्यांना शक्य आहे त्यांनी इतर मदतीसह आर्थिक मदतही करावी ही विनंती.
धन्यवाद.
आपले,
नागपूर बीजोत्सव 2015 कार्यक्रम पत्रिका
13.02.2015 | पहिला दिवस | |
दु. 2 ते 2.10 | 1 |
अन्न सार्वभौमत्त्वाबाबत
हे बीजोत्सवाचे तिसरे वर्ष. आपण सर्व “अन्न” या दुव्याला धरून एकामेकांशी जोडले गेलो आहोत. अन्न कसे असावे यावर ढोबळमानाने एकमत असलेली आपण सर्व लोकं. < अन्न सार्वभौमत्वाबद्दल थोडक्यात मांडणी > . तर आपण या बीजोत्सवाची सुरुवात या प्रवासात जोडलेल्या काही साथींसोबत गप्पा मारून करूयात.
|
2.10 ते 3.15 | 2 |
प्रकट मुलाखत
शेतकरी, ग्राहक व कार्यकर्त्यांचे प्रतिनिधित्व करणार्यांची मुलाखत ज्यातून थोडक्यात आपल्या अन्नासंबंधीची कल्पना स्पष्ट होईल.
|
3.15 ते 3.30 | 3 | एका वेगळ्या पद्धतीने उद्घाटन. |
3.30 ते 4 | 4 | अल्पविराम |
4 ते 4.30 | 5 | कार्यक्रम पत्रिका वाचन व सूचना |
4.30 ते 7 | 6 |
बीजे संवर्धनाबद्दल
- बीज संवर्धकांचे अनुभव कथन (4.30-5.30)
- बीज संवर्धन करणार्यांना जाणविलेले धोके (5.30-6)
- जैवविविधता समित्या व त्याद्वारे बीजसंवरर्धन व संरक्षण (6-6.30)
- पुढे काय करणे गरजेचे? (6.30-7.30)
- कृती कार्यक्रम (7.30-7.45)
- जबाबदार्यांचे वाटप (7.45-8)
|
8 ते 9.30 | 7 | भोजन |
9.30 पासून | 8 | सांस्कृतिक कार्यक्रम, गाणी, कविता, खेळ, इ. |
14.02.2015 | दुसरा दिवस | |
9 पर्यंत | 1 | नाष्ता, इ. आवराआवर आटोपणे |
9 ते 12.30 | 2 |
शाश्वत शेती चळवळ व महिला शेतकर्यांचा सहभाग
- शाश्वत शेतीला असणारे धोके (9-9.30)
- शेतीतील महिलांचा सहभाग व त्यांचे प्रश्न (9.30-10.10)
- चळवळ व कामाची सद्यस्थिती (10.10-10.25)
- चळवळीतील समस्या (10.25-10.45)
- पुढे कसे जावे यावर चर्चा (10.45-11.45)
- कृती कार्यक्रम बनविणे (11.45-12.15)
- जबाबदार्यांचे वाटप (12.15-12.30)
|
12.30 ते 2 | 3 | भोजन |
2 ते 5.30 | 4.अ |
ग्राहकांसाठीचे समांतर सत्र
शहरी शेती (परसबागा, गच्चीवरील भाजीपाला)
- शहरी शेती करणार्यांचे अनुभव कथन (2-2.40)
- शहरी शेती करू इच्छिणार्यांच्या अडचणी (2.40-3)
- त्या अडचणी सोडविण्यासाठी आराखडा (3-3.30)
- शहरी शेती स्वतः करणे व त्याच्या प्रचार-प्रसाराचा कृतीकर्यक्रम बनविणे (3.30-4)
- जबाबदार्यांचे वाटप (4-4.15)
शहरी ग्राहकांना अन्नसुरक्षेसंबंधी मार्गदर्शन
- विषयुक्त अन्न कसे टाळावे? (4.15-4.40)
- अन्नधान्य साठवणुकीच्या विषमुक्त पद्धती (4.40-5.05)
- सेंद्रीय बियाण्यांचे महत्त्व (5.05-5.30)
|
2 ते 5.30 | 4.ब |
शेतकर्यांचे समांतर सत्र
शाश्वत शेतीशी अजून न जोडल्या गेलेल्या शेतकर्यांशी संवाद
- शाश्वत शेतीशी अजून न जोडल्या गेलेल्या शेतकर्यांचे मनोगत (2-2.30)
- त्यांना शाश्वत शेती अवलंबण्यासाठी येणार्या अडचणी (2.30-3)
- त्या अडचणी सोडवता येण्यासाठी काय उपाय करता यॆईल यावर चर्चा व कृती आराखडा बनविणे (3-4)
- जबाबदार्यांचे वाटप (4-4.15)
शाश्वत शेती व बीज संवर्धनाची चळवळ पुढे नेण्यासाठी स्थानिक अभ्यास गटांचे नियोजन
- अभ्यास गट कशासाठी? (4.15-4.30)
- आजपर्यंत अभ्यास गटांची वाटचाल (4.30-4.45)
- अभ्यास गटांचे पुढील नियोजन (4.45-5.15)
- जबाबदार्यांचे वाटप (5.15-5.30)
|
5.30 ते 6.30 | 5 | अल्पविराम |
6.30 ते 8 | 6 | सांस्कृतिक कार्यक्रम, गाणी, कविता, खेळ, इ. |
रात्री 8 | 7 | भोजन |
15.02.2015 | तिसरा दिवस | |
9 पर्यंत | 1 | नाष्ता, इ. आवराआवर आटोपणे |
9 ते 12.30 | 2 |
शेतकरी ग्राहक मेळावा
- विषयुक्त अन्नाच्या परिणामांचे अनुभव (9-9.30)
- विषमुक्त अन्न मिळवताना येणार्या अडचणी (9.30-10.15)
- विषमुक्त शेतमाल पुरविण्याच्या अडचणी (10.15-11)
चर्चा व त्यातून कृती आराखडा
- विषमुक्त अन्न देवाण-घेवाण प्रक्रियेचे स्वरूप कसे असू शकेल? (11-11.45)
- कृती कार्यक्रम (11.45-12.15)
- जबाबदार्यांचे वाटप (12.15-12.30)
|
12.30 ते 2 | 3 | भोजन |
2 ते 3 | 4 | प्रतिक्रिया व मुक्त चिंतन |
3 ते 3.30 | 5 | सर्व सत्रांच्या निष्पत्तींचे व जबाबदारी घेणार्यांच्या नावांचे जाहीर वाचन |
3.30 ते 3.45 | 6 | बीजोत्सवाच्या जमा-खर्चाचे जाहीर वाचन |
3.45 ते 4 | 7 | समारोप |
Nice initiative.
ReplyDelete