· ही शेतीची पुरातन पध्दती नाही. ही निसर्ग, विज्ञान व आध्यात्म आधारित नवीन कृषी पध्दती आहे.
· आपल्याला कोणतीही निविष्टा बाहेरून विकत आणून शेतात टाकावी लागत नाही.
· या पध्दतीमध्ये आपल्याला ट्रक, ट्रक्टर, बैलगाडीने शेणखत तसेच रासायनिक खते, सेंद्रिय खते, गांडूळखत विकत आणून शेतात टाकावे लागत नाही. कीटकनाशक औषधे विकत आणून फवारण्याची गरज नाही. किंबहुना फळबागेत मशागतपूर्णपणे बंद. कालांतराने नांगरणीची आवश्यकता पडत नाही.
· एका गावरान देशी गाई पासून या पध्दतीनुसार आपण ३० एकर शेती करू शकता - मग ती सिंचित किंवा असिंचित असो.
· या पध्दतीत रासायनिक व सेंद्रिय शेतीच्या तुलनेत १०% पाणी व १०% विजेची आवश्यकता असते. म्हणजेच ९०% पाणी व विजेची बचत. बाजारातील महागडया ठिबक सिंचनाची/शेततळ्याची कटकट नाही.
· या पध्दतीमुळे आपणाला उत्पादन रासायनिक व सेंद्रिय शेतीपेक्षा मुळीच कमी मिळणार नाही, उलट जास्त मिळेल.
· या कृषी पध्दतीतून मिळालेला शेतमाल हा पूर्णतः विषमुक्त, पौष्टिक, दर्जेदार व स्वादिष्ट असतो. त्यामुळे बाजारात या चांगल्या शेतमालाला जास्त मागणी असते व भावही चांगलाच मिळतो.
· प्रचलित बाजार व्यवस्थे मध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाची किंमत ठरविण्याचा अधिकार नाही. परंतु झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये शेतकरी आपल्या शेतमालाचे भाव स्वतः ठरवितो.
· रासायनिक व सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून दर वर्षी लाखो करोडो रुपये आपल्या देशातून विदेशात जातात. परंतु झिरो बजेट नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून एक पैसासुद्धा देशा बाहेर जात नाही. फक्त ही कृषी पध्दतीच देशाची होणारी लुट रोखूशकते.
· रासायनिक शेतीमध्ये दरवर्षी उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे तर सेंद्रिय शेतीत तो दुप्पट/तिप्पट होतो. परंतु हया नैसर्गिक शेती पध्दतीत उत्पादन खर्च शून्य आहे.
· रासायनिक व सेंद्रिय शेतीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत व अन्नधान्याचे संकट निर्माण होते आहे. परंतु झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये मात्र एकही शेतकरी आत्महत्या करीत नाही आणि सामाजिक, आर्थिक व कौटुंबिकसंकटसुध्दा दूर होऊ शकते.
· रासायनिक व सेंद्रिय शेतीमुळे मानव, पशु, पक्षी, पाणी, पर्यावरणाचा विनाश होत आहे. परंतु झिरो बजेट नैसर्गिक शेतीमुळे या सर्वांचा विनाश रोखला जातो व नैसर्गिक संसाधनांची शाश्वतता वाढते.
· झिरो बजेट नैसर्गिक शेतीतील सशक्त पिके अवकाळी हवामानात तग धरून उभी राहतात. जरी अवकाळी संकट आलं तरी दु:ख वाटत नाही कारण झिरो बजेट असल्याने खर्च शून्य आहे.
· सेंद्रिय शेती ही रासायनिक शेती पेक्षा खूप घातक, विषारी व खर्चिक आहे. परंतु नैसर्गिक शेती खर्चमुक्त, विषमुक्त, शोषणमुक्त व कल्याणकारी आहे.
· संपूर्ण भारतात व भारताबाहेर अंदाजे ४० लाख पेक्षा जास्त शेतकरी झिरो बजेट नैसर्गिक शेती करून सुखी, समाधानी व आनंदी आहेत. आणि हया प्रकारची शेती करणाऱ्याची संख्या वाढत आहे.
· उत्पादन खर्च शून्य, उत्पादन जास्त, मालाचा दर्जा उत्तम, बाजारात मागणी चांगली, भाव जास्त अश्या झिरो बजेट नैसर्गिक शेतीमुळे खेड्याकडून शहराकडे होणारे मानवी स्थलांतर रोखता येईल. गावातील पैसा गावात राहील, गावातला पैसाशहराकडे जाणार नाही. उलट शहरातील पैसा गावात येईल व गाव/खेडी समृध्द होतील. तसेच देशाचा पैसा देशात राहील, विदेशात जाणार नाही. उलट विदेशातील पैसा आपल्या देशात येईल.
· सरकार छोटया-मोठ्या कंपन्यांना फायदा होईल अशीच ध्येय धोरणं राबवत आहे. मग ती बी.टी. (BT) बियाणांच्या नावे संपूर्ण पिकां/अन्नावर नियंत्रण मिळवणे असो किंवा आधुनिक शेतीच्या नावे कृषी प्रदर्शनातून नवनवीन साधन सामग्री विकत घेण्यास आकर्षित करून शेतकऱ्याची लुट करणे असो. आज देशी कापूस बियाणं जवळपास नामशेष होऊन संपूर्ण कापूस पिक काही कंपन्यांच्या हातात गेले आहे. तिच परिस्थिती भेंडी, वांग, सोयाबीन, गहू, तांदूळ इतर सर्व फळ-धान्य-भाजीपाल्या वर येणार आहे. हे सर्व षड्यंत्र समजून घेऊन वेळीच सावध होणे फार गरजेचे आहे.
· शेतकरी शेत जमिनीला एक व्यवसाय किंवा एक वस्तू म्हणून पाहू लागला, स्वावलंबनातून परावलंबी होत चालला, पैशाच्या अती लोभापायी अजून जास्त खर्च करू लागला पण त्यामुळे पैसा (व मनःशांती) त्या पासून अधिकच दूर निघूनजात आहे. काळ्या आईची मनोभावे जोपासना केली तर पैसा, सुख-समाधान आपोआप त्याच्याकडे परत येईल.
· झिरो बजेट नैसर्गिक शेती आंदोलन केवळ शेतकऱ्यांचे आंदोलन नाही तर ते शेतकरी व उपभोक्ता ग्राहक हया दोघांचे आंदोलन आहे. हया आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मध्यस्त मुक्त शेतकरी ते थेट उपभोक्ता ग्राहक अशी विक्री व्यवस्थाउभी करीत आहोत. यामुळे दोघांचेही होणारे शोषण थांबवता येईल.
· कोणतेही सरकार (किंवा समाजातील प्रत्येक व्यक्ती) जर आपल्या देशाला वाचवू पाहत असेल, येणाऱ्या भावी पिढीला जिवंत ठेवू पाहत असेल, अन्नधान्य संकट टाळू पाहत असेल व मानव, पशु, पक्षी, पाणी व पर्यावरणाचा विनाश रोखू पाहतअसेल, तर त्यांच्या समोर केवळ एकच पर्याय आहे, तो म्हणजे झिरो बजेट नैसर्गिक शेती.
· या सर्व बाबी विचारात घेऊन समाजाच्या प्रत्येक घटकाने झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा स्वीकार केला पाहिजे व या आंदोलनात आपला सहभाग दिला पाहिजे.
· कृषी ऋषी श्री. सुभाष पाळेकर यांची ३/४/५ दिवसांची निवासी शिबरं होतात त्यात आपण ही शेती पध्दती सखोलपणे समजून घेऊ शकता. पुढील शिबिराच्या माहितीसाठी खालील दिलेल्या कोणत्याही मोबाईल/ई-मेल वर संपर्क साधावा.
श्री. सुभाष पाळेकर ह्यांची मराठीतून पुस्तकं
क्र. पुस्तकाचे नांव
|
क्र. पुस्तकाचे नांव किंमत(रु.)
|
१) आध्यात्मिक शेती - तत्वज्ञान व तंत्रज्ञान १००/-
|
११) झिरो बजेट नैसर्गिक फळ शेती (द्राक्ष, केळी, इ. )
|
२) नैसर्गिक शेती - काळाची गरज
|
जमीन पहेलवान कशी बनवावी ? (भाग १ ) १२०/-
|
३) गावरानी गाय - एक कल्पवृक्ष कृषी संस्कृती १००/-
|
फळ शेतीचे पोषण शास्त्र (भाग २) १५०/-
|
४) गावरानी बीज राखा - भावी गुलामी रोखा ३०/-
|
फळ शेतीचे सहजीवन शास्त्र (भाग ३) १३०/-
|
५) सावधान, अन्नाचा प्रत्येक घास विषारी आहे २०/-
|
१२) झिरो बजेट नैसर्गिक ऊस शेती
|
६) ज्वलंत शेतमजूर समस्या व शेती उत्पादन १०/-
|
जमीन पहेलवान कशी बनवावी ? (भाग १ ) १२०/-
|
७) गॅट कराराचे पालन - व्यवस्थेचे मरण १०/-
|
ऊस शेतीचे पोषण शास्त्र (भाग २) १५०/-
|
८) हरित क्रांती का नको ?
|
ऊस शेतीचे सहजीवन शास्त्र (भाग ३) १३०/-
|
९) आध्यात्मिक शेतीचा मोक्ष मार्ग
|
१३) नैसर्गिक संत्रा व मोसंबी लागवड ७०/-
|
१०) काय सेंद्रिय शेती षड्यंत्र आहे ?
|
१४) नैसर्गिक भात व गहू लागवड
|
नोंद:
• पुस्तके हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगु, कन्नड व अन्य भाषांमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत.
|
१५) नैसर्गिक कापूस लागवड तंत्र:मंत्र ७०/-
|
१६) नैसर्गिक कांदा लागवडीचे झिरो बजेट ५०/-
| |
१७) नैसर्गिक टोमॅटो लागवडीचे झिरो बजेट ७०/-
| |
झिरो बजेट नैसर्गिक शेती शोध, विकास व प्रसार आंदोलन
१९, जया कॉलनी, टेलीकॉम कॉलनी जवळ, नवाथे चौक, बडनेरा रस्ता, अमरावती - ४४४ ६०७ (महाराष्ट्र)
|
हे पत्रक मिलिंद काळे यांनी प्रसार व प्रचारासाठी जाने.२०१४ मध्ये प्रकाशित केले आहे. झिरो बजेट नैसर्गिक शेती संबंधात अधिक माहितीसाठी अवश्य संपर्क करा: मिलिंद काळे - मो. ९८९०६६४३२१, ९८५०४३००८५ / ई-मेल:MilindShrirangKale@gmail.com