Friday, May 20, 2016

मोन्सँटो विरोधी दिवस - मार्च अगेन्स्ट मोन्सँटो २१ मे २०१६

जी. एम. बियाणे आणि ‘राउंडअप’ तणनाशकाची निर्माती मोन्सँटो कंपनी सध्या जगभर गाजत आहे. या कंपनीच्या

स्वतःच्या देशात म्हणजे खु्द्द अमेरिकेतच तिला प्रखर विरोध होत आहे. हा विरोध वाढत वाढत जागतिक

स्तरावर पोचला. गतवर्षी २०१५ साली ४० देशातील ४०० शहरांमध्ये जनतेने मोन्सँटो विरोधात निदर्शने केली.

तणनाशक: मोन्सँटो च्या राउंडअप तणनाशकात ‘ग्लायफोसेट’ रसायन आहे. ग्लायफोसेटमुळे कर्करोगाची संभावना

असल्याचे ‘जागतिक आरोग्य संघटनेने’ जाहीर केले आहे. श्रीलंकेने ‘ग्लायफोसेट’ तणनाशकावर बंदी आणली आहे;

तिकडे मूत्रपिंडाचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढलेत. अमेरिकन जनतेच्या खाण्यापिण्यात, मातेच्या दुधातसुद्धा

ग्लायफोसेट आढळत असल्याचे बोलल्या जाते; कॅलिफोर्निया राज्याने ग्लायफोसेटवर बंदी आणली आहे.

आपल्या देशात या उलट चित्र आहे. मोन्सँटोच्या राउंडअप तणनाशकाचा प्रचार महाराष्ट्रात जोरात सुरु आहे.

‘तणमुक्त महाराष्ट्र’ ही त्यांची घोषणा आहे. तणनाशके सुरक्षित असल्याचा दावा ते गावोगावी करतात. शेतकरी

या प्रचाराला बळी पडतात.

जी. एम. बियाणे: सध्या जी.एम. बियाण्यांमध्ये बी.टी. व एच.टी. (तणनाशक सहिष्णु - Herbicide Tolerant) असे दोन

प्रकार आहेत. मोन्सँटोच्या बी. टी. कापसाला भारतात २००२ साली परवानगी मेळाली. आरंभी बोलगार्ड – १ (BGI)

आणि नंतर बोलगार्ड – २ (BGII) हे बियाणे बाजारात आले. सध्या त्यांचे रेडी राउंडअप फ्लेक्स (RRF) हे परवानगी

न मिळालेले कापूस बियाणे मागील दाराने गावोगावी पोचले आहे. हे बियाणे तणनाशक सहिष्णू (H.T. Herbicide

Tolerant) आहे. म्हणजे तणनाशकाचा वापर केल्यावर इतर पिके काही दिवस माघारतात तसे या बियाण्यांपासून

उगवणारे पीक तणनाशक फवारल्यावर माघारणार नाही. याचा अर्थ तणनाशकांचा वापर वाढविण्यासाठी आर. आर.

एफ बियाण्याची योजना केली आहे.

एकीकडे कीटकनाशकांचा वापर कमी करण्यासाठी जी. एम. बियाणे असल्याचा प्रचार करायचा आणि दुसरीकडे

अत्यंत घातक सिद्ध होत असलेल्या तणनाशकांचा व्यापार वाढवायचा असा हा मोन्सँटोचा कारभार आहे. सध्या

कापूस, गहू, सोयाबीन, मका, मोहरी पिकांचे जी. एम. बियाणे काही देशात मोठ्या प्रमाणार वापरल्या जाते.

बी. टी. कापूस: बी. टी. कापसावर आरंभी काही वर्षे बोंडअळीचा प्रादुर्भाव नव्हता. यंदा (२०१५) गुजरातमध्ये मोठ्या

प्रमाणावर आणि विदर्भात सुद्धा गुलाबी बोंडअळीचा हल्ला झाला. पंजाबमध्ये तर करहरच झाला. बी. टी. कापसावर

पांढऱ्या माशीचा जबरदस्त हल्ला झाला, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले, त्यापायी आत्महत्यासुद्धा झाल्यात.

दुष्परिणाम: आजघडीला महागडे बी. टी. कापूस बियाणे वापरूनसुद्धा पूर्वीइतकाच कीटकनाशकांचा वापर करावा

लागतो; रासायनिक खताच्या मात्राही दरवर्षी वाढत आहेत. हे पीक पावसाचा ताण सहन करत नाही. या

बियाण्यांच्या झाडाच्या मुळा वरवरच राहतात, खोल जात नाहीत. एकूण शेती व्यवस्था जी. एम. बियाण्यांमुळे

बिघडत आहे. जी.एम. बियाणे आणि त्यांच्या सोबतीने येणारी तणनाशके यांचा मानवी आरोग्य, मधमाशा,

जमिनीतील उपयुक्त जीव-जिवाणु आणि एकूण पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असल्याचे विविध अभ्यासांचे

निष्कर्ष आहेत. हे तंत्रज्ञान ग्राहक, शेतकरी सगळ्यांनाच खड्ड्यात घालणारे आहे. जी. एम. बियाण्यांमुळे सेंद्रिय

शेतमाल आणि परंपरागत बियाणे कायमचे दूषित होण्याचा मोठा धोका आहे.

जी. एम. बियाण्यांमुळे आरोग्याच्या गंभीर समस्या – कर्करोग, वांझपणा, जन्मजात विकृती निर्माण होत असल्याचे

संशोधन अभ्यासाचे निष्कर्ष आहेत. बी. टी. कापसाच्या सरकीचे तेल, अशा सरकीचा वापर गुरांसाठी केल्यावर

मिळणारे दूध, आयात केलेले सोयाबीन तेल आणि विदेशातून भारतात आलेली तयार खाद्य सामग्री (Fast Food)

अशा वस्तुंद्वारे जी. एम. खाद्यन्न भारतीयांच्या आहारात पोचले आहे; यांच्या दिर्घकाळ सेवनाने होणाऱ्या

दुष्परिणामांचे पुरेपूर आकलन आज आपणास नाही.

महाराष्ट्रातील परिस्थिती: जी. एम. बियाणे आणि तणनाशकाचे वास्तव भयानक आहे, तरीही अख्ख्या महाराष्ट्रभर

मोन्सँटोच्या ‘तणमुक्त महाराष्ट्र’ जाहिराती गावोगावी झळकत आहेत; राउंडअप तणनाशकाचा प्रचार धुमधडाक्यात

सुरु आहे. या सर्वावर कडी करणारी घटना फेब्रु.१६ मध्ये मेक इन ईंडीया सप्ताहात घडली. मोन्सँटोला देशातील

सर्वात मोठे बियाणे केंद्र साकारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने देऊळगाव-राजा जि. बुलढाणा येथे जागा देऊ केली;

सरकार सोबत दोन दिवसात करार होणार असल्याचे ही जाहीर जाले होते. “मोन्सँटोला जगभर विरोध होत

असतांना महाराष्ट्र या कंपनीच्या एवढया प्रेमात का पडत आहे?”

जी. एम. बियाण्यांच्या खुल्या वातावरणातील चाचण्यांना परवानगी देण्यातही महाराष्ट्र अग्रेसर आहे. जनतेच्या

विरोधानंतर या परवानगीचा फेरविचार झाला मात्र ते काम सुद्धा श्री. अनिल काकोडकर साहेबांकडेच दिल्या गेलं.

या चाचण्यांना परवानगी देणाऱ्या समितीचे अध्यक्ष तेच होते आणि फेरविचार सुद्धा त्यांनीच केला. त्यांचं उत्तर

आलं ‘ जनतेने घेतलेल्या आक्षेपांचा आम्ही आधीच विचार केला आहे.’ यापेक्ष वेगळं उत्तर अपेक्षित नव्हतच.

ज्याच्या विरुद्ध तक्रार तोच चौकशी अधिकारी असेल तर वेगळं काय होणार?

तिकडे दिल्ली विद्यापीठात जी. एम. मोहरीचा विकास श्री दीपक पेंटल या वैज्ञानिकाच्या नेतृतवाखाली झाला. या

बियाण्याच्या चाचण्यांचे निष्कर्ष सार्वजनिक करायला पेंटल साहेब तयार नाहीत. आधी परवानगी मिळू द्या

म्हणतात. वैज्ञानिक जगतात अशी गुप्तता!

मध्ये बातमी आली; नागपूरचे सेवानिवृत्त वैज्ञानिक श्री शरद पवार यांनी श्री दिपक पेंटल यांच्या जी. एम. मोहरी

मुळे ३०% उत्पादनवाढ होणार असल्याचा दावा खोडून काढला. सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या मोहरी च्या जातीशी जी.

एम. मोहरीची तुलना न करता त्यांनी दुसऱ्याच जातीशी तुलना करून आपल्या सोयीनुसार निष्कर्ष काढल्याचे ड़ॉ.

पवार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

एकदा जी. एम. मोहरीला व्यापारी लागवडीसाठी परवानगी मिळाली की मोन्सँटो आणि ईतर कंपन्यांच्या जी. एम.

बियाण्यांची रांग लागणार, (बायर, सिंजेंटा, ड्यूपोंट, बी.बी.एस.एफ ई. कंपन्याही या कारभारात आहेतच). ज्वारी,

बाजरी, मका, गहू, धान, तूर, भुईमुगापासून टमाटर, कोबी, अश्वगंधा, सर्पगंधा पर्यंत सर्वच बियाणे कंपन्यांनी तयार

शासनाचे दुटप्पी धोरण: भारत सरकारने बी. टी. कापूस बियाण्यांचे भाव आणि मोन्सँटो कंपनीला दिली जाणारी

रॉयल्टी ठरविण्यासाठी समिती नेमली. ४५० ग्रामच्या पाकीटामागे दिली जाणारी १६३ रु. रॉयल्टी कमी करून ४९

रु. करण्याचे समितीने सुचविले. यावर कंपनीची प्रतिक्रिया ठरलेलीच आली ‘ संशोधनासाठी निधी उरणार नाही, बी.

टी. तंत्रज्ञानाचे लायसंस रद्द करु.’ कंपनीकडून यापेक्षा वेगळ्या काय अपेक्षा करायच्या? (भारतात बी. टी. कापूस

तयार करणाऱ्या कंपन्या ही रॉयल्टी मोन्सँटोला देत असतात, यातून मोन्सँटोला घरबसल्या प्रचंड कमाई होते.)

९९% शेतकरी आमचं बी. टी. कापूस बियाणं वापरतात असं मोन्सँटो कंपनीचा म्हणणं आहे. अशा परिस्थितीत

त्यांनी बी. टी. तंत्रज्ञानाचं लायसंस नाकारलं तर आमचं काय होणार? हा विचार करून काही पर्यायी व्यवस्था

आमच्या सरकारनं केली आहे, करणार आहे काय? देशातील कृषी विद्यपीठे, महाबीज सारखे निमसरकारी

प्रतिष्ठान, राष्ट्रीय बीज निगम (National Seed Corporation) आणि अनुकूल असलेल्या खाजगी कंपन्या,

शेतकर्यांच्या प्रोडुसर कंपन्या, स्वयंसेवी संस्था ई. कामी लावल्यास बियाणे स्वावलंबन एका वर्षात शक्य आहे.

देशहितासाठी ते करायचे की मोन्सँटोंसाठी पायघड्या घालायच्या (आणि त्याही महाराष्ट्रात) हे सरकारला ठरवायचे

विषारी तंत्रज्ञान: ‘जी. एम. बियाण्याचं तंत्रज्ञान विषारी आहे’ हे जगानं अनुभवलेलं आहे. जे बियाणं स्वतःच विष

तयार करतं (अथवा ज्यात तणनाशकाचे विष पचवण्याची क्षमता आहे असं H.T. बियाणं) ते ‘मानव आणि

सृष्टीसाठी’ सुरक्षित कसं असु शकेल? पण कंपन्या मात्र जी. एम. बियाण्याचं तंत्रज्ञान सुरक्षित असल्याचा प्रचार

सतत करीत आहेत. त्या साठी प्रचंड डॉलर ओतले जातात. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार असलेल्या

हिलेरी क्लिंटन बाईने २०१४ साली ३ लाख ३५ हजार डॉलर भाषणाच्या फी पोटी मोन्सँटोच्या जी. एम. ओ.

(लॉबीस्ट फ्रंट) ग्रुप कडून घेतल्याचे आरोप निवडणुकीच्या तोंडावर होत आहेत.

भारतात मात्र याबाबत नगण्य जागृती आहे. शेतकरी आणि सुशिक्षित, अशिक्षित दोन्ही प्रकारचे ग्राहक जी. एम.

बियाणे आणि त्या सोबत जुळलेल्या तणनाशकादी कृषी रसायनांच्या दुष्परिणामांबाबत अनभिज्ञ आहेत. व्यापक

जनजागृती करून आपण ही परिस्थिती बदलण्याचे यथाशक्ती प्रयत्न करुया. २१ मे २०१६ ‘आंतरराष्ट्रीय मोन्सँटो

विरोधी दिवस’ ही त्यासाठी संधी आहे. महाराष्ट्रात १०-२० ठिकाणी हा कार्यक्रम करता येईल का? या आधी

जनजागृती यात्रा सुद्धा होऊ शकतात. अर्थात पारंपारिक बियाण्यांचे जतन, जी. एम. विरोध आणि सेंद्रिय /

नैसर्गिक शेती प्रचार-प्रसार सोबत सोबतच असावे लागतील.

कृपया आपले विचार कळवावे.

नागपूर बीजोत्सव गट

आकाश नवघरे - ९०७५०१२७४५ रुपिंदर नंदा - ९८६०७३१६६६

वसंत फुटाणे - ९४२२९५८७६७ तन्मय जोशी - ८०८७५०२१८६

No comments:

Post a Comment