मोन्सॅंटोविरूद्ध मोर्चा - २१ मे
नागपूर, दिनांक २० मे २०१६: "दिनांक २१ मे २०१६ रोजी जगभरातील ४० पेक्षा अधिक देशांमधील सुमारे
३५० शहरांमधून 'मार्च अगेंस्ट मोन्सॅंटो' आंदोलन होत आहे. जगभरातील अन्नव्यवस्थेचे नियंत्रण करू पाहणाऱ्या,
असंख्य शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेती सोडण्याला जबाबदार असलेल्या आणि सोपी शेती आणि पैशांच्या
हव्यासापोटी अन्नात प्रचंड प्रमाणात विष मिसळणाऱ्या मोन्सॅंटो या बहुराष्ट्रीय कंपनीला एक प्रतीक म्हणून
वापरून एकूणच जगभरातील अौद्योगिक शेतीच्या समर्थकांचा विरोध दर्शविण्यासाठी मागील पाच वर्षापासून
जगभरातील विविध ठिकाणचे लोक, संस्था, संघटना २१ मे ला हा उपक्रम घेत आहेत.” अशी माहिती नागपूर
बीजोत्सव गटाचा कार्यकर्ता आकाश नवघरे याने दिली.
या निमित्तावर शहरात राहून कंपन्यांची कोणतीही निविष्ठा न वापरता आपल्या गच्चीवर परसबाग
फुलविणाऱ्या रुपिंदर नंदा म्हणाल्या, "यावर्षी नागपूर आणि परिसरातील शेतीच्या प्रश्नावर काम करणाऱ्या
मित्रसंघटनांनी या जागतिक हाकेला प्रतिसाद देवून 'मार्च अगेंस्ट मोन्सॅंटो' उपक्रमात सहभाग नोंदविण्याचे ठरविले
आहे. त्यानुसार दि. २१ मे रोजी नागपूर आणि परिसरातील ग्राहक, शेतकरी, कार्यकर्ते, विद्यार्थी संध्याकाळी ५.००
वाजता आर.बी.आय. स्क्वेअर, नागपूर येथे जमतील. सुरूवातीला या कार्यक्रमाचे निमित्त, गरज आणि मोन्सॅंटो हे
प्रकरण नेमके काय आहे याबाबत शेतीअभ्यासक मार्गदर्शन करतील. त्यानंतर आर.बी.आय. स्क्वेअर ते व्हरायटी
स्क्वेअर ते परत आर.बी.आय. स्क्वेअर या मार्गावर मोर्चा काढण्यात येईल. यात विशेष म्हणजे कंपन्यांच्या
बियाणे, खतांशिवात शेती करणारे, मोनसॅंटो चे बियाणे न वापरता बिगर बिटी कापूस घेणारे शेरकरीसुद्धा या
गतवर्षी आपल्या शेतात देशी कापूस घेणाऱ्या कीर्ती मंग्रुळकर म्हणाल्या, “आज भारतातील ९५% हून
अधिक कापूस हा मोन्सॅंटो कंपनीच्या बियाण्यांपासून तयार केलेला आहे. त्यापाई आपला देश इतका परावलंबी
झाला आहे की दरवर्षी शेकडो कोटी रुपये एका विदेशी बहुराष्ट्रीय कंपनीला दिल्याशिवाय आपण आपला कपडाच
काय, पण आपला राष्ट्रध्वजदेखील बनवू शकत नाही. ही आपल्या सर्वांसाठीच शरमेची बाब आहे. आणि अशी
परिस्थिती असताना महाराष्ट्र शासन पायघड्या घालून मोन्सॅंटोला भारतातील सर्वात मोठे बियाणे उत्पादन केंद्र
विदर्भात उभे करण्यास बोलवत आहे.”
"आमची चळवळ ही केवळ पोकळ विरोधाची चळवळ नाहीए. एखादी गोष्ट नकारताना आम्ही त्याचे
वैज्ञानिक व सामाजिक विश्लेषण करतो व त्या गोष्टीस पर्याय देखील सुचवितो. त्यामुळे या मोर्च्यानिमित्त आम्ही
कंपनीच्या कापडाला व बियाण्यांना पर्याय म्हणून देशी कापसापासून तयार केलेली खादी व सूत लोकांसमोर
आणत आहोत." आशी माहिती आकाशने या प्रसंगी दिली.
शेवटी नागपूर बीजोत्सव गटाच्या कार्यकर्त्या, एक उद्योजिका व सेंद्रीय शेतकरी श्यामला सन्याल यांनी
नागपूरातील सर्व जनतेला आवाहन केले, "आपल्या अन्नाची सुरक्षिततेसाठी, आपल्या मुलांचे भवितव्यासाठी
अधिकाधिक संख्येने सर्वांनी या मोर्चात सामील व्हावे, हा विषय समजून घ्यावा आणि मोन्सॅंटोच्या व अौद्योगिक
शेतीच्या इतर सर्व पुरस्कर्त्यांच्या विघातकी, साम्राज्यवादी कृत्यांना विरोध दर्शवावा.”
मोन्सॅंटो विरूद्ध मोर्चा - दि. २१ मे २०१६, सायं ५ वाजता
आर.बी.आय चाैक ते गांधी पुतळा, व्हरायटी चौक, नागपूर.
अधिक माहितीसाठी संपर्क:
आकाश नवघरे - ९७६६९१२७४५, किर्ती मंग्रुळकर – ९५५२५५६४६५, रुपींदर नंदा - ९८६०७३१६६६
----------
March Against Monsanto - 21st May
Nagpur 21st May 2016: On 21st May about 350 cities from more than 40
countries around the world will be doing ‘March Against Monsanto’. Akash
Naoghare, an activist from ‘Nagpur Beejotsav Group’ said, “The event is happening
since last 5 years on 21st May, to protest a multinational giant, Monsanto, who are
poisoning our food, killing our farmers and looking forward to control the food
system all over the world.”
On this occasion, Rupinder Nanda, who is doing terrace gardening in Nagpur
without using any inputs from market, told, "This year different organizations,
movements and people in and around Nagpur have decide to be part of this
movement. Accordingly consumers, farmers, activists, students in and around Nagpur
will gather at RBI square, Nagpur, evening 5.00 p.m. At the beginning experts on
genetically modified (GM) food issue will explain why this protest, what is Monsanto
and what it is doing to us. It will be followed by a March from RBI square to Variety
square back to RBI square. Specially the farmers who are doing farming, growing
indigenous cotton without use of any agricultural inputs from market will participate
in this protest.”
Kirti Mangrulkar, who harvested indigenous cotton in her own farm said,
“Today 95% of the area under cotton is using G.M. seeds by Monsanto. This has
made us so dependent on others that not only the clothes, but even our National flag
cannot be made without paying thousands of rupees of royalty to the foreign
multinational companies. This is rather a very disgraceful fact for us as a country.
And in this situation Maharashtra govt. is making special provisions to welcome
companies like Monsanto in Maharashtra to grow their business.”
“Ours is a movement of constructive opposition. We support our stands with
scientific and social evidence and don't just stop at it, but provide an alternative
solution as well. Therefore, as an alternative to the company-based cloth produced
from company based cotton, we are going to bring in front of everyone khadi made
from indigenous cotton using non-industrial process.” Akash Naoghare told at this
In the end, an activist from Beejotsav Group and organic farmer Shyamala
Sanyal appealed all the citizens of Nagpur to be part of this event for sake of the
future of our children, for safe food, understand this issue and protest the life-
threatening and imperialistic acts of Monsanto.”
March Against Monsanto - 21st
RBI Square to Gandhi Putla, Variety Square, Nagpur.
For more information:
Akash Naoghare - 9766912745, Kirti Mangrulakar - 9552556465, Rupinder Nanda -

No comments:
Post a Comment